नाशिक-सातपूरमधील अतिक्रमणे मनपा प्रशासन आणि पोलीस बंदोबस्तात हटवली
Encroachment hits Satpur
नाशिक-सातपूरमधील अतिक्रमणे मनपा प्रशासन आणि पोलीस बंदोबस्तात हटवली


नाशिक, 02 मार्च (हिं.स.)। सातपूर येथील वनविभागाच्या जागेवर अनधिकृत पणे तीस वर्षापासून व्यावसायिक अतिक्रमणे मनपा प्रशासन, पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कारवाई अखेर पार पडली.या कारवाईमुळे अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,संबंधित वन विभागाच्या जमिनीवर व्यावसायिकांनी विनापरवाना पत्रा शेड आणि टपऱ्यांचे अतिक्रमण केले होते. वन विभागाच्या माध्यमातून संबंधितांना वारंवार नोटिसा बजावून स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.मात्र, दिलेल्या मुदतीत अतिक्रमणे न काढल्याने अखेर प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण करीत पोलीस बंदोबस्तात ही धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. कारवाई सुरू होताच काही टपरीधारक व्यावसायिकांनी याला कडाडून विरोध केला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस अधिकारी व मनपाच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेल्या नागरिकांना कायद्याची समज दिली आहे,” असे सांगत प्रशासनाने कोणाचेही ऐकून न घेता कारवाई सुरूच ठेवली होती त्या ठिकाणी एका जागृत देवीचे मंदिर असल्यामुळे अनेक वेळा नागरिकांनी गोमास विक्री तसेच नॉनव्हेज हॉटेलवर कारवाई करण्यासाठी तक्रारी केलेल्या होत्या ही संपूर्ण बाब लक्षात घेता प्रभाग 11 मधील लोकप्रतिनिधी यांनी आवाज उचलल्यानंतर नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी पाहणी करत तात्काळ अतिक्रमण जमीन उध्वस्त करण्यासाठी सांगितले

कार्यवाही वेळी अतिक्रमण जेसीबी कर्मचारी तसेच वाहने या सह पोलीस प्रशासनाच्या वतीने सातपूर अंबड चिंचोळे येथील पोलीस निरीक्षक तसेच कर्मचारी एस आर पी दाखल झालेले होते यासाठी सकाळपासूनच रूग्नवाहिका, अग्निशमन दल ,ड्रोनद्वारे चित्रीकरणा सह,पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande