विज्ञान प्रदर्शन ते खेळ पैठणीचा; आगरवाडी शाळेत विद्यार्थ्यांचा व पालकांचा जल्लोष
पालघर, 02 मार्च (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम येथील ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळ, Lions Club of Bombay West संचलित इंग्रजी माध्यम शाळा, आगरवाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन, खाद्य पदार्थ जत्रा आणि खेळ पैठणीचा
विज्ञान प्रदर्शन ते खेळ पैठणीचा; आगरवाडी शाळेत विद्यार्थ्यांचा व पालकांचा जल्लोष


पालघर, 02 मार्च (हिं.स.)।

पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम येथील ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळ, Lions Club of Bombay West संचलित इंग्रजी माध्यम शाळा, आगरवाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन, खाद्य पदार्थ जत्रा आणि खेळ पैठणीचा असे तीन उपक्रम उत्साहात पार पडले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष चिंतामण ठाकूर यांच्या हस्ते नुकताच झाले. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध विज्ञान प्रयोगांसह ऐतिहासिक किल्ल्यांची प्रतिकृती, पृथ्वी संवर्धन, प्रदूषणाचे दुष्परिणाम, घरांचे प्रकार, चित्रकला, शिल्पकला व हस्तकलेचे नमुने सादर करण्यात आले. यानंतर खाद्य पदार्थ जत्रेचे उद्घाटन संस्थेचे संचालक भरत चौधरी यांच्या हस्ते झाले. या जत्रेत विद्यार्थ्यांनी घरून तयार केलेले विविध पदार्थ विक्रीसाठी आणले होते. ग्राहकांच्या समाधानातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळाला. व्यवहारिक ज्ञान, गणिती आकडेमोड व उद्योजकतेची ओळख हा या जत्रेचा मुख्य उद्देश होता. यावेळी पालकांसाठी खास आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमाला रंगत आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नियुक्ती शुभम पाटील होत्या. निवेदिका लतिका पंकज पाटील यांनी विविध खेळ घेतले. त्यातून दहा महिला विजेत्या ठरल्या. महिलांना दैनंदिन जबाबदाऱ्यांतून विरंगुळा देणे आणि महिला सक्षमीकरणाचा आनंद साजरा करणे हा या उपक्रमाचा हेतू होता. पैठणी जिंकलेल्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. विजेत्या महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पैठणी बक्षिसे प्रदान करण्यात आली. अध्यक्ष पी. टी. पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली भोईर व सहकारी शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची साथ दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande