हरिद्वार येथे भव्य स्वरूपात होणार कुंभ मेळा- पुष्कर सिंह धामी
देहरादून, 02 मार्च (हिं.स.) : उत्तराखंडच्या हरिद्वार येथे भव्य कुंभ मेळ्याचे आयोजन करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली. देहरादून येथे आज, सोमवारी भाजप कार्यालयात आयोजित होलिका उत्सवात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होत
डेहराडून येथे होळी उत्सवात सहभागी झालेले पुष्कर सिंह धामी


देहरादून, 02 मार्च (हिं.स.) : उत्तराखंडच्या हरिद्वार येथे भव्य कुंभ मेळ्याचे आयोजन करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली. देहरादून येथे आज, सोमवारी भाजप कार्यालयात आयोजित होलिका उत्सवात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशवासियांनी होळीच्या शुभेच्छा दिल्यात.

याप्रसंगी धामी यांनी सांगितले की उत्तराखंड राज्य इतर राज्यांच्या तुलनेत वेगाने विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी 500 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे.राज्य प्रशासन, मेला प्रशासन आणि जिल्हाधिकारी सर्व व्यवस्था पूर्ण करण्यासाठी वेगाने काम करत आहेत. तसेच 7 मार्च रोजी अमित शाह उत्तराखंड दौऱ्यावर येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या दौऱ्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना सर्व व्यवस्था वेळेत, सुबक आणि सन्मानपूर्वक पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्था कडक ठेवणे, वाहतूक आणि पार्किंगचे योग्य नियोजन करणे तसेच स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा आणि आरोग्य सेवा यांची पुरेशी सोय करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. होळी हा सण लोकांना एकत्र आणणारा असून परस्परांतील प्रेम आणि बंध दृढ करणारा आहे. या पावन पर्वाच्या निमित्ताने राज्याच्या विकासासाठी पूर्ण समर्पणाने कार्य करण्याचा संकल्प करण्यात येईल असे धामी म्हणाले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande