मोहरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचा लोकार्पण सोहळा
छत्रपती संभाजीनगर, 02 मार्च (हिं.स.)। मोहरा येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. या ऐतिहासिक क्षणाला विविध
अ


छत्रपती संभाजीनगर, 02 मार्च (हिं.स.)।

मोहरा येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला.

या ऐतिहासिक क्षणाला विविध साधू-संत, महंत व मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यांच्या साक्षीने शिवरायांच्या तेजस्वी स्मृतींना अभिवादन करत स्वराज्य, शौर्य, न्याय आणि धर्मनिष्ठेचा संदेश पुन्हा एकदा सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आला.

शिवरायांचा पुतळा हा केवळ एक स्मारक नसून तो प्रत्येकाच्या मनात स्वाभिमान, धैर्य आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारा प्रेरणास्त्रोत आहे. त्यांच्या विचारांवर चालत समाजात एकता, बंधुता आणि विकासाचा मार्ग अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande