लातूरचे नागरिक दुबई आणि अबू धाबीमध्ये सुरक्षित; जिल्हा प्रशासन सतत संपर्कात
लातूर, 02 मार्च मध्यपूर्व आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे लातूर जिल्ह्यातील १३ नागरिक सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) अडकले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, लातूर आणि जिल्हा प्रशासनाच्या माहितीप्रमाणे, सर्व नागरिक सुरक्षित असून विम
जिल्हा माहिती कार्यालय


लातूर, 02 मार्च मध्यपूर्व आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे लातूर जिल्ह्यातील १३ नागरिक सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) अडकले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, लातूर आणि जिल्हा प्रशासनाच्या माहितीप्रमाणे, सर्व नागरिक सुरक्षित असून विमानसेवा सुरू होताच ते स्वदेशी परतीचा प्रवास करतील.

अडकलेल्या नागरिकांचा तपशील:-

लातूर शहर :- रुद्रेश्वर नगर – राहुल कदम

सरस्वती कॉलनी – नेहा मनोज मिसर

* जुना औसा रोड – मच्छिंद्र सुडके

न्यू भाग्य नगर – मेघना सुभाष कानडे

ग्रामीण भाग : -देवणी तालुका, दवण हिप्परगा – सचिन गुणवंतराव पाटील

निलंगा तालुका, शिंदी जवळगा – मनोजकुमार बांकटराव कोरे

औसा तालुका, किल्लारी – स्वप्नील गुलाब पानकुरे

रेणापूर तालुका, घवहाण – शुभम गोपाळ पवार

अबू धाबीतील नागरिक:- लातूर शहर, न्यू रेणापूर नाका – ज्ञानेश्वर रामराव मुकादम, योगेश्वरी ज्ञानेश्वर मुकादम

* औसा – अनिल भीमाशंकर उटगे, राजश्री अनिल उटगे, प्रांजल अनिल उटगे

सदर सर्व नागरिक दुबईतील फॉर्च्युन कराम* आणि अबू धाबीतील ली रॉयल मेरीडियन हॉटेलमध्ये सुरक्षित थांबले आहेत. आं

तरराष्ट्रीय विमान सेवा रद्द झाल्यामुळे त्यांच्या परतीचा प्रवास थांबला आहे.

जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांशी सतत संपर्क साधला असून महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारसोबत आवश्यक समन्वय सुरू ठेवला आहे. नागरिकांना अधिक माहितीसाठी किंवा इतर अडकलेल्या नागरिकांच्या बाबतीत दूरध्वनी क्रमांक (०२३८२) २२०२०४ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, लातूर

----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande