धर्मवीर बलिदान मासामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण-जयकुमार गोरे
सोलापूर, 02 मार्च (हिं.स.)। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी धर्मासाठी केलेला त्याग अतुलनीय आहे. धर्मवीर बलिदान मासामुळे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण समाजातील प्रत्येकाला होते असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे
Jaykumar gore newss


सोलापूर, 02 मार्च (हिं.स.)। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी धर्मासाठी केलेला त्याग अतुलनीय आहे. धर्मवीर बलिदान मासामुळे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण समाजातील प्रत्येकाला होते असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवस्मारक येथे आयोजित रक्तदान शिबिरात २७६ जणांनी रक्तदान करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली. यात सोलापूर शहरातून १७५ तर दक्षिण सोलापूर तालुक्यातून १०१ जणांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी दिलेली धर्माची शिकवण नव्या पिढीला माहीत व्हावी, त्यांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा हा उद्देश श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कामातून सफल होताना दिसत आहे.छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या धर्मवीर बलिदान मासानिमित्त दरवर्षी राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्या अंतर्गत सोलापूर शहरात रक्तदान शिबिर घेण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande