पुणे-कोंढवा ते येवलेवाडी मार्गावर धावणार मेट्रो
पुणे, 02 मार्च (हिं.स.)दक्षिण पुण्यातील कोंढवा आणि येवलेवाडी परिसरातील रहिवाशांना लवकरच मेट्रो मिळणार असल्यची शक्यता आहे. शिवाजीनगरपासून ते येवलेवाडीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याच्या सध्या प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सर्व मंजुऱ्या आणि सर्वेक्षण वेळ
पुणे-कोंढवा ते येवलेवाडी मार्गावर धावणार मेट्रो


पुणे, 02 मार्च (हिं.स.)दक्षिण पुण्यातील कोंढवा आणि येवलेवाडी परिसरातील रहिवाशांना लवकरच मेट्रो मिळणार असल्यची शक्यता आहे. शिवाजीनगरपासून ते येवलेवाडीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याच्या सध्या प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सर्व मंजुऱ्या आणि सर्वेक्षण वेळेत पूर्ण झालं तर 2030-31पर्यंत ही मेट्रो मार्गिका सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर ते येवलेवाडी अशी 20 किमी लांब उन्नत मार्गिका उभारण्याचं काम हाती घेतले असल्याची माहिती दिली.हिंजवडी ते शिवजीनगर 23 किमी लांब मार्गिकेच्या विस्तारीकरणाचा हा एक भाग आहे. हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारली जात आहे. परंतु, कोंढवा ते येवलेनगर मेट्रोचं काम थेट महामेट्रोकडून करण्यात येणार आहे. या मार्गावर एक अतिरिक्त स्परद्वारे एनबीएम ते उंड्री विस्तारही होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला कॅम्प आणि पुलगेट मार्गे जोडण्याचा प्रस्ताव आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande