सावरोली टोल नाक्यावर ६०० किलो गोमांस जप्त, चौघे ताब्यात
रायगड, 02 मार्च (हिं.स.) । खालापूर तालुक्यातील सावरोली टोल नाक्यावर पहाटेच्या सुमारास रंगलेल्या संयुक्त कारवाईत सुमारे ६०० किलो संशयित गोमांस जप्त करण्यात आले आहे. गोरक्षक कार्यकर्ते आणि खालापूर पोलीस यांच्या समन्वयातून ही कारवाई पार पडली. घटनेनंतर
Khalapur shaken; 600 kg of beef seized from Scorpio


रायगड, 02 मार्च (हिं.स.) । खालापूर तालुक्यातील सावरोली टोल नाक्यावर पहाटेच्या सुमारास रंगलेल्या संयुक्त कारवाईत सुमारे ६०० किलो संशयित गोमांस जप्त करण्यात आले आहे. गोरक्षक कार्यकर्ते आणि खालापूर पोलीस यांच्या समन्वयातून ही कारवाई पार पडली. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून संशयास्पद मालाची वाहतूक सुरू असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानंतर संबंधित वाहनाचा पाठलाग करण्यात आला. सावरोली टोल नाक्यावर वाहन थांबताच कार्यकर्त्यांनी त्याला घेराव घालत पोलिसांना कळवले.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहनाची झडती घेतली असता, आतील भागात मोठ्या प्रमाणात मांसाचे पोते आढळून आले. प्राथमिक तपासात ते गोमांस असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मालाचे वजन सुमारे ६०० किलो असल्याचे सांगितले जात आहे. अधिकृत पुष्टीसाठी नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

या प्रकरणी वाहनातील चार जणांना ताब्यात घेऊन संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास यंत्रणा पुढील चौकशी करत असून अवैध वाहतूक रॅकेटशी संबंधित दुव्यांचा शोध घेतला जात आहे.घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. पुढील तपासात आणखी उलगडे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande