
सोलापूर, 02 मार्च (हिं.स.)जिल्हा परिषदेतील लिपिकवर्गीय कर्मचार्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पहिला, दुसरा व तिसरा लाभ मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने कर्तव्यनिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आभार मानण्यात आले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पदभार घेतल्यापासून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर न्यायाची भूमिका घेतली आहे. अनुकंपा भरती, पदोन्नती व बदलांमध्ये त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे. शासनाच्या आलेल्या आदेशाचे वेळोवेळी पालन करी कर्मचाऱ्यांना अनेक लाभ लागू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड