कुतूबखेडा रस्ता लोकार्पण सोहळा तसेच सिमेंट बंधारा व सिमेंट रस्ता भूमिपूजन सोहळा
छत्रपती संभाजीनगर, 02 मार्च (हिं.स.)। पैठण तालुक्यातील दादेगाव येथे रा. मा. 61 ते दादेगाव बु. खु. ते. कुतूबखेडा रस्ता लोकार्पण सोहळा तसेच सिमेंट बंधारा व सिमेंट रस्ता भूमिपूजन सोहळा खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कामाचे भू
अ


छत्रपती संभाजीनगर, 02 मार्च (हिं.स.)।

पैठण तालुक्यातील दादेगाव येथे रा. मा. 61 ते दादेगाव बु. खु. ते. कुतूबखेडा रस्ता लोकार्पण सोहळा तसेच सिमेंट बंधारा व सिमेंट रस्ता भूमिपूजन सोहळा खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण करत ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.

या विकासकामांमुळे गावातील नागरिकांना दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार असून वाहतुकीची सोय अधिक सुलभ होईल. सिमेंट बंधाऱ्यामुळे पाणीसाठा वाढून शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे, तर सिमेंट रस्त्यामुळे गावातील अंतर्गत संपर्क अधिक मजबूत होणार आहे. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हीच आपली प्राथमिकता असून अशा कामांमुळे गावांच्या प्रगतीला नवी गती मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande