
लातूर, 02 मार्च (हिं.स.)। अनधिकृत रेनिसन्स इंग्लिश शाळेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाची कोणतीही परवानगी नसताना २०१९ पासून इयत्ता ६ वी ते १० वी चे वर्ग सुरू ठेवणाऱ्या रेनिसन्स इंग्लिश शाळे विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तीव्र आंदोलन छेडले आहे.
शिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२५ व २५ फेब्रुवारी २०२६ रोजी शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे शासनमान्य शाळेत स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. मात्र आदेशाला न जुमानता शाळा सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. याच्या निषेधार्थ मनविसेच्या वतीने शाळेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी संतोष नागरगोजे, किरण चव्हाण, भागवत शिंदे, रवी सूर्यवंशी, मनोज अभंगे, अनिल पांढरे, अंकुश शिंदे, बाळासाहेब मुंडे, सचिन सिरसाठ, बालाजी कांबळे, ध्रुव महापूरकर, रवी पांचाळ, चंदू केंद्रे, महादेव महाडकं, योगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis