श्रीकृष्ण विचार हे आजही समाजासाठी गरजेचे आणि दिशादर्शक -मयूर भावे
पुणे, 02 मार्च (हिं.स.) कृष्ण नीती म्हणजे केवळ भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सांगितलेले विचार नाहीत तर श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवन म्हणजेच कृष्ण नेते आहे. त्यासाठी श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व समजून घेतले पाहिजे. श्रीकृष्णाचे सर्व गुण आ
श्रीकृष्ण विचार हे आजही समाजासाठी गरजेचे आणि दिशादर्शक -मयूर भावे


पुणे, 02 मार्च (हिं.स.) कृष्ण नीती म्हणजे केवळ भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सांगितलेले विचार नाहीत तर श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवन म्हणजेच कृष्ण नेते आहे. त्यासाठी श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व समजून घेतले पाहिजे. श्रीकृष्णाचे सर्व गुण आपल्यामध्ये येणे शक्य नाही परंतु त्या पैकी एखादा गुण आपण आत्मसात करू शकतो श्रीकृष्ण विचार हे आजही समाजासाठी गरजेचे आणि दिशादर्शक आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत मयूर भावे यांनी व्यक्त केले. नागरिक सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गरज कृष्ण नीतीची या विषयावरील व्याख्यानमालेत मयूर भावे बोलत होते. संस्थेचे वक्ता विभाग प्रमुख दीपक मेहेंदळे, विश्वस्त अमेय सप्रे, प्रीतम थोरवे आदि यावेळी उपस्थित होते.

मयूर भावे म्हणाले, आजच्या काळामध्ये असलेला हिंसेचा अर्थ हा श्रीकृष्णाचा विचार नाही. श्रीकृष्णाचा हिंसेचा विचारवेगळा आहे. समाजाच्या हितासाठी आवश्यक असणारी हिंसा ही हिंसा ठरत नाही तर तो पराक्रम ठरतो हेच आपण महाभारतातून शकतो. आजच्या काळामध्ये अहिंसेचा चुकीचा अर्थ लावला जात आहे परंतु श्रीकृष्णाचे जो पराक्रमाचा विचार आणि शिकवण आहे ती आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. भूतकाळाचे विस्मरण होऊ न देता आणि भविष्याचा वेध मनामध्ये ठेवून वर्तमान काळ आपल्या हातातून निसटू न देणे म्हणजेच श्रीकृष्ण नीती आहे. श्रीकृष्ण नीती ही कृतीपेक्षा उद्देशाला महत्त्व देते. त्यामुळे आपला उद्देश हा कायम चांगला आणि देशाप्रती योग्य ठेवला पाहिजे. श्रीकृष्ण नीती आपल्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अंगीकारून आपण सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून देशासाठी काय करू शकतो याचा विचार प्रत्येक तरुणाने केला पाहिजे. हा विचार जर प्रत्येक तरुणाने आयुष्यामध्ये अंगीकारला तर भारत निश्चितच एक समृद्ध राष्ट्र म्हणून उदयास येऊ शकेल असेही मयूर भावे यांनी यावेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande