देवळाली-नवी अमरावती दरम्यान अनारक्षित मेमू विशेष गाड्यांचे संचालन
अमरावती, 02 मार्च (हिं.स.) होळीच्या पावन सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनामार्फत देवळाली (नाशिक) नवी अमरावती दरम्यान अनारक्षित मेमू विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या विशेष गाड्यांचा उद्देश प्रवाशांना स
होळीनिमित्त प्रवाशांसाठी नवी अमरावती - नाशिक विशेष अनारक्षित मेमू


अमरावती, 02 मार्च (हिं.स.)

होळीच्या पावन सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनामार्फत देवळाली (नाशिक) नवी अमरावती दरम्यान अनारक्षित मेमू विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या विशेष गाड्यांचा उद्देश प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देगे हा आहे. देवळाली नवी अमरावती अकोले स्टेशन अनारक्षित मेमू विशेष गाडीच्या एकूण ६ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे अमरावतीच्या प्रवाशांना होळीच्या कालावधीत देवळाली कॅम्प नाशिक ते अमरावती पर्यंत सुलभ प्रवास करता येणार आहे. गाडी क्रमांक ०११०३ अनारक्षित विशेष मेमू २, ३ व ४ मार्च रोजी देवळाली येथून दु. १.३५ वाजता निघेल, नवी अमरावती येथे रात्री ९.३० वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०११०४ अनारक्षित विशेष मेमू ३, ४ व ५ मार्च रोजी नवी अमरावती येथून पहाटे ५.२० वाजता निघेल व देवळाली येथे दुपारी १२.४० वाजता पोहोचेल. मार्गात ही विशेष मेमू नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, - जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, अकोला, मूर्तिजापूर व बडनेरा या - स्टेशनवर थांबा घेईल. या मेमूला १२ कोच आहेत.

एलटीटी-हटिया-एलटीटी विशेष रेल्वेगाडीच्या ४ सेवाट्रेन क्रमांक ००६१० विशेष ४ व ११ मार्चला लोकमान्य टिकळ टर्मिनस एलटीटी येथून पहाटे ५ वाजता निघेल वहटिया येथे दुसऱ्या दिवशी सायं. ६ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ००६०९ विशेष२व९ रोजी हटिया येथून दु ४.२० वाजता निघेल व एलटीटी येथे तिसऱ्यादिवशी उशिरा रात्री १२.४० वाजता पोहोचेल. मार्गात ही विशेष ट्रेनठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर,

झारसुगुडा आणि राउरकेला येथे द्वितीय, ५ वातानुकूलित तृतीय, २ थांबा घेणार असून २ वातानुकूलित वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ७शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ आणि१ जनरेटर व्हॅन अशी या विशेष सामान्य द्वितीयसह गार्ड्स ब्रेक व्हॅन रेल्वे गाडीची रचना आहे. ही ट्रेन बडनेरा येथे एलटीटीहून येताना सायं. पोहोचेल. त्यामुळे या रेल्वेने नागपूर, ८ वाजता बडनेरा स्टेशनवर छत्तीसगड येथे जाता येणार आहे. त्याचप्रमाणे हटिया ते एलटीटी ट्रेनने मुंबईकडे रवाना होता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande