
पालघर, 02 मार्च (हिं.स.)।
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ विरारतर्फे ८ मार्च २०२६ रोजी ‘पिंक मॅरेथॉन’चे (फक्त महिलांसाठी) आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही धाव स्पर्धा यशवंत नगर, विरार पश्चिम येथे सकाळी ६ ते १० या वेळेत होणार आहे.
३ किमी व ५ किमी धावांसाठी ₹९,००० ते ₹३,००० अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली असून सर्व सहभागींसाठी टी-शर्ट, मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुकांनी खालील लिंकवर नोंदणी करावी:
https://forms.gle/Vw89PgDvr3a4dJYZ6
अधिक माहितीसाठी संपर्क:
तेजस काटकर – +९१ ७०६६३७१५५५
ओमकार पाटील – +९१ ७२७६७०५३५६
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL