
पुणे, 02 मार्च (हिं.स.)। महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या 10 जागांसाठी जवळपास 400 जण इच्छुक असल्याचे समोर आले आहे. त्यात भाजपकडे सर्वाधिक 300पेक्षा अधिक इच्छुक असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 75 जणांनी अर्ज केले आहेत. तर, काँग्रेसच्या एक जागेसाठी तब्बल 15 जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे नेत्यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.
महापालिका निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीकडे लक्ष लागले आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सर्व गटनेत्यांना पत्र देऊन स्वीकृत सदस्य नेमणुकीसाठी नावे देण्यास सांगितले आहे. त्यासाठी 9 मार्च ही अखेरची मुदत आहे. महापालिकेत इच्छुक 10 स्वीकृत सदस्यांच्या नेमणुका होणार आहेत.त्यात भाजपचे सर्वाधिक 7, राष्ट्रवादी काँग्रेस 2, काँग्रेस 1 या पद्धतीने नेमणुका होणार आहेत. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांची लगबग वाढली आहे. त्यासाठी इच्छुकांकडून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार लॉबिंग सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु