पुणे, पिंपरीतील ५९ ‘आरएमसी’ प्रकल्पांना टाळे
पुणे, 02 मार्च (हिं.स.)वाढते शहरीकरण, ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे, मेट्रोचे काम आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची हवा अत्यंत वेगाने प्रदूषित होत आहे. या गंभीर प्रश्नावर ‘सकाळ’ने ‘गुदमरतोय श्वास’ या वृत्तमालिकेतून सविस
पुणे, पिंपरीतील ५९ ‘आरएमसी’ प्रकल्पांना टाळे


पुणे, 02 मार्च (हिं.स.)वाढते शहरीकरण, ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे, मेट्रोचे काम आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची हवा अत्यंत वेगाने प्रदूषित होत आहे. या गंभीर प्रश्नावर ‘सकाळ’ने ‘गुदमरतोय श्वास’ या वृत्तमालिकेतून सविस्तर प्रकाश टाकत प्रशासनाला जागे केले होते. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) हवेची गुणवत्ता बिघडविणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन्ही शहरांतील तब्बल ५९ ‘रेडीमिक्स कॉंक्रीट’ (आरएमसी) आणि स्टोन क्रशर प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले आहेत.‘एमपीसीबी’चे प्रादेशिक अधिकारी बाळासाहेब कुकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘ग्रॅप’रची (ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन) कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिले आहेत. शहरात सुरू असलेल्या मोठ्या बांधकाम प्रकल्पांसाठी ‘आरएमसी’ प्लांटची गरज असते. मात्र, या ठिकाणी नियमांचे पालन न केल्यास त्यातून प्रचंड धूळ उडून प्रदूषणात भर पडते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande