
‘चुनिए भरोसा, अपनो सा’ मोहिमेचा शुभारंभ
नाशिक, 02 मार्च (हिं.स.) : भारतातील आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय जनरल इन्शुरन्सने प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांची ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. यासोबतच कंपनीने ‘चुनिए भरोसा, अपनो सा’ या सर्वसमावेशक ब्रँड मोहिमेची देखील घोषणा केली आहे.
आरोग्य विम्यावर आधारित नवी जाहिरात ‘चुनिए भरोसा, अपनो सा’ मोहिमेअंतर्गत कंपनीने एक नवी आरोग्य विमा जाहिरात फिल्म सादर केली आहे. ही फिल्म कुटुंबांच्या सुरक्षेसाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून कंपनीची भूमिका अधोरेखित करते. दैनंदिन आयुष्यातील छोट्या-छोट्या कृतींमधून व्यक्त होणारी काळजी, जबाबदारी आणि अढळ पाठबळ यांमधूनच खरा विश्वास निर्माण होतो, या संकल्पनेवर ही मोहीम आधारित आहे. जाहिरातीत पंकज त्रिपाठी यांना कुटुंबातील शांत आणि प्रमुख आधारस्तंभ म्हणून सादर करण्यात आले आहे. कुटुंबाच्या गरजांना प्राधान्य देणारा, कृतीतून आपुलकी व्यक्त करणारा आणि जबाबदारीने उभा राहणारा व्यक्तिरेखा त्यांनी प्रभावीपणे साकारली आहे. या कथानकातून गरजेच्या वेळी आत्मविश्वासाने पाठीशी उभे राहणाऱ्या एसबीआय जनरल इन्शुरन्सचे महत्त्व अधोरेखित होते. या जाहिरातीची संकल्पना TBWALintas यांनी विकसित केली असून त्यांनीच तिचे दिग्दर्शनही केले आहे.
आरोग्य विम्याची वाढती गरज
आजच्या बदलत्या आरोग्यसेवा पार्श्वभूमीवर व्यापक आरोग्य विमा हा आर्थिक नियोजनाचा अत्यावश्यक भाग ठरत आहे. वाढता वैद्यकीय खर्च, अनिश्चित वातावरण आणि वाढती आरोग्यजागरूकता यामुळे आरोग्य विमा हा पर्याय नसून गरज बनत चालला आहे. एसबीआय जनरल इन्शुरन्स तंत्रज्ञानाधारित सेवा, उत्पादन नवोपक्रम आणि पारदर्शक दावा निपटारा प्रक्रियेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी विमा अधिक सोपा आणि सुलभ करण्यावर भर देत आहे.
अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
एसबीआय जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ नवीन चंद्र झा म्हणाले, “भारतात कुटुंबांची आरोग्यसेवा आणि आर्थिक सुरक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन झपाट्याने बदलत आहे. ‘चुनिए भरोसा, अपनो सा’ मोहिमेद्वारे आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबतच्या भागीदारीद्वारे आम्ही विमा अधिक सुलभ आणि प्रतिसादक्षम बनवण्याची आमची वचनबद्धता अधिक बळकट करत आहोत.”
ब्रँड ऍम्बेसेडर पंकज त्रिपाठी म्हणाले की, “एसबीआय जनरल इन्शुरन्ससारख्या विश्वासार्ह ब्रँडशी जोडले जाणे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. ‘चुनिए भरोसा, अपनो सा’ हे घोषवाक्य आपुलकी, जबाबदारी आणि कुटुंबभावनेला साद घालणारे आहे. या मोहिमेद्वारे आरोग्य विम्याचे महत्त्व देशभर पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे.”
कंपनीचे मार्केटिंग आणि सीएसआर प्रमुख रथिन लाहिरी यांनीही पंकज त्रिपाठी यांचे स्वागत करताना सांगितले की, ही जाहिरात सामान्य माणसातील असामान्य जिद्दीचे कौतुक करते आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आरोग्य विम्याचे महत्त्व अधोरेखित करते.
देशव्यापी प्रसारण
ही सर्वसमावेशक मोहीम प्रिंट, टीव्ही, ओओएच, ओटीटी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जाणार आहे. भावनिक कथाकथन आणि प्रभावी संवादाच्या माध्यमातून ‘चुनिए भरोसा, अपनो सा’ हा संदेश देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा मानस आहे.ब्रँड रिकॉल मजबूत करणे, ग्राहकांशी भावनिक नाते निर्माण करणे आणि आर्थिक संरक्षणातील विश्वासार्ह भागीदार म्हणून एसबीआय जनरल इन्शुरन्सचे स्थान अधिक दृढ करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis