लातूर जिल्ह्यात ३ व ८ मार्च रोजी मद्यविक्री बंद
लातूर, 02 मार्च (हिं.स.)।लातूर जिल्ह्यात धुलीवंदन व रंगपंचमीनिमित्त ३ मार्च, २०२६ आणि ८ मार्च, २०२६ रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत. ३ मार्च २०२६ धुलीवंदननिमित्त सायंकाळी ६ वाजेपर्यंत उदगीर, जळकोट, द
मद्यविक्री राहणार बंद


लातूर, 02 मार्च (हिं.स.)।लातूर जिल्ह्यात धुलीवंदन व रंगपंचमीनिमित्त ३ मार्च, २०२६ आणि ८ मार्च, २०२६ रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत. ३ मार्च २०२६ धुलीवंदननिमित्त सायंकाळी ६ वाजेपर्यंत उदगीर, जळकोट, देवणी, अहमदपुर तालुका व निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, तगरखेडा व शेळगी या गावातील मद्यविक्री बंद राहणार आहे.

तसेच ८ मार्च २०२६ रोजी रंगपचंमीनिमित्त लातूर, औसा, रेणापूर, शिरुर अनंतपाळ, चाकूर व निलंगा तालुक्यातील (निलंगा तालुकयात औराद शहाजनी, तगरखेडा, शेळगी ही गावे वगळून) मद्यविक्री सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. हे आदेश सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती यांना लागू राहतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई करणाऱ्या अनुज्ञप्तीधारंकाविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा १९४९ व अनुषंगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक केशव राऊत यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande