
छत्रपती संभाजीनगर, 02 मार्च (हिं.स.)।
संभाजीनगर पंचायत समिती सभापतीपद खुल्या गटासाठी आरक्षित करण्यात आले आहे.१० मार्चला निवड होणार आहे
जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकांनंतर सभापती व उपसभापती निवडीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार १० मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता संबंधित पंचायत समित्यांच्या सभागृहात विशेष सभा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गासाठी राखीव आहे. उमेदवारी अर्ज सभेच्या दोन तास आधी स्वीकारले जातील. एकूण सदस्यांच्या एकतृतीयांश उपस्थितीची गणपूर्ती आवश्यक असून प्रथम सभापती, त्यानंतर उपसभापती निवड होईल. निवड प्रक्रियेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis