चंद्रग्रहणामुळे श्री घृष्णेश्वर मंदिर दुपारी बंद
छत्रपती संभाजीनगर, 02 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील वेरुळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. दि. ३ मार्च २०२६ रोजी मंगळवारी होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मंदिर दुपारी ३ ते सायंकाळी ७ वा
चंद्रग्रहणामुळे श्री घृष्णेश्वर मंदिर दुपारी बंद


छत्रपती संभाजीनगर, 02 मार्च (हिं.स.)।

जिल्ह्यातील वेरुळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. दि. ३ मार्च २०२६ रोजी मंगळवारी होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मंदिर दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

ग्रहणकाळात धार्मिक परंपरेनुसार मंदिरातील नियमित पूजाविधी व दर्शन व्यवस्था तात्पुरती स्थगित करण्यात येईल. ग्रहण समाप्तीनंतर मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली. भाविकांनी प्रशासनास सहकार्य करून नियोजनानुसार दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande