सोलापूर-चोरीला गेलेला 325 जणांचा 3 कोटींचा ऐवज वर्षात केला परत
सोलापूर, 02 मार्च (हिं.स.) सोलापूर शहरातील घरफोडी, जबरी चोरीसह वाहन चोरीच्या ३२५ गुन्ह्यांची उकल गुन्हे शाखेच्या पथकांनी एका वर्षात केली आहे. त्यात सात दिवसा घरफोड्या, रात्रीच्या ४४ घरफोड्या, १४ जबरी चोरी, चोरीला गेलेल्या १६१ दुचाकी व दोन चारचाकीसह
सोलापूर-चोरीला गेलेला 325 जणांचा 3 कोटींचा ऐवज वर्षात केला परत


सोलापूर, 02 मार्च (हिं.स.) सोलापूर शहरातील घरफोडी, जबरी चोरीसह वाहन चोरीच्या ३२५ गुन्ह्यांची उकल गुन्हे शाखेच्या पथकांनी एका वर्षात केली आहे. त्यात सात दिवसा घरफोड्या, रात्रीच्या ४४ घरफोड्या, १४ जबरी चोरी, चोरीला गेलेल्या १६१ दुचाकी व दोन चारचाकीसह इतर ९७ चोरीचे गुन्हे आहेत. पोलिसांनी केवळ चोरट्यांना शोधलेच नाही तर त्यांच्याकडून तब्बल तीन कोटी रुपयांचा ऐवज देखील हस्तगत केला.१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात सोलापूर शहर गुन्हे शाखेने कौतूकास्पद कामगिरी करीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तडीपार करुनही शहरात फिरणाऱ्या १६ जणांना पकडले. विविध गुन्ह्यातील ४२ वॉन्टेड (पाहिजेत) आरोपींनाही पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. एमडी ड्रग्ज, गांजा जवळ बाळगणाऱ्यांनाही गुन्हे शाखेच्याच पथकाने जेरबंद केले. सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुर्गी नाला परिसरातील एका तृतीयपंथीचा खून करणाऱ्या तिघांना अवघ्या सहा तासातच गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande