
बीड, 02 मार्च (हिं.स.)।
येत्या ३ मार्च २०२६ रोजी भारतात खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण या वर्षातील भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण असून खगोलप्रेमींसाठी ही एक महत्त्वाची घटना ठरणार आहे. देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागात हे ग्रहण पूर्णतः म्हणजे खग्रास स्वरूपात दिसेल, तर महाराष्ट्रात ते खंडग्रास रूपात अनुभवायला मिळेल. ३ मार्चच्या सायंकाळी चंद्रोदयाच्या वेळेपासून हे ग्रहण दिसण्यास सुरुवात होईल. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून हे ग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे, कारण २०२६ मध्ये भारतातून दिसणारे हे एकमेव ग्रहण असेल. विदर्भातील चंद्रपूरसह राज्यातील सर्व भागांतून नागरिकांना निसर्गाचा हा चमत्कार पाहता येणार आहे. प्रशासनाने आणि खगोल मंडळांनी नागरिकांना या वैज्ञानिक घटनेचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे. ही घटना अभ्यासकांसाठी चंद्राच्या छायेचा सखोल अभ्यास करण्याची मोठी संधी ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis