अंबाजोगाई उपविभागामध्ये सुरू असलेली पोलीस पाटील भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक
बीड, 02 मार्च (हिं.स.)। अंबाजोगाई उपविभागामध्ये सुरू असलेली पोलीस पाटील भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारावर राबवली जात असल्याची ग्वाही उपविभागीय अधिकारी यांनी दिली आहे. लेखी परीक्षेनंतर आता पात्र उमेदवारांच्या मुलाखतीची प्र
अंबाजोगाई उपविभागामध्ये सुरू असलेली पोलीस पाटील भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक


बीड, 02 मार्च (हिं.स.)।

अंबाजोगाई उपविभागामध्ये सुरू असलेली पोलीस पाटील भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारावर राबवली जात असल्याची ग्वाही उपविभागीय अधिकारी यांनी दिली आहे. लेखी परीक्षेनंतर आता पात्र उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू झाली असून, या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निवडीचा मुख्य निकष केवळ गुणवत्ता हाच असल्याने उमेदवारांनी किंवा त्यांच्या पालकांनी फसवणूक करणाऱ्या मध्यस्थांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

भरती प्रक्रियेच्या नावाखाली काही समाजकंटक दिशाभूल करण्याची शक्यता असून, अशा अफवांकडे दुर्लक्ष करून उमेदवारांनी केवळ आपल्या कष्टावर लक्ष केंद्रित करावे. कोणाकडूनही पैशांची मागणी झाल्यास उमेदवारांनी तत्काळ तक्रार नोंदवावी. उमेदवारांचे शिक्षण, लेखी परीक्षा आणि मुलाखत यांच्या एकत्रित गुणांच्या आधारावरच अंतिम निवड केली जाणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande