अमेरिका - इराण युद्ध; सोलापूरचे दहा पर्यटक अबुधाबी विमानतळावर अडकले
सोलापूर, 02 मार्च (हिं.स.)। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. मध्यपूर्वेतही हल्ले होत असल्यामुळे तेथील हवाई वाहतूक पूर्णतः बंद केली आहे. त्यामुळे सोलापुरातून दुबईला पर्यटनासाठ
Collactor kumar


सोलापूर, 02 मार्च (हिं.स.)। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. मध्यपूर्वेतही हल्ले होत असल्यामुळे तेथील हवाई वाहतूक पूर्णतः बंद केली आहे. त्यामुळे सोलापुरातून दुबईला पर्यटनासाठी गेलेले दहा पर्यटक अबुधाबी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर अडकून पडले आहेत. इराण-इराक या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इराक येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. या संदर्भात मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) संपर्क साधण्यात आलेला असून, कोणत्याही नागरिकाकडून इराण-इराक येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांना कळविण्यात येईल. सदर बाबीची नोंद घेऊन नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande