पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियानांतर्गत भाजप जिल्हा ग्रामीण कार्यालयात कार्यशाळा संपन्न
लातूर, 02 मार्च (हिं.स.)। पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियानांतर्गत भाजप जिल्हा ग्रामीण कार्यालयात कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी पक्षाचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष श्री. संजय कौडगे यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान याबाबत सविस्
भाजप


लातूर, 02 मार्च (हिं.स.)।

पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियानांतर्गत भाजप जिल्हा ग्रामीण कार्यालयात कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी पक्षाचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष श्री. संजय कौडगे यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी या अभियानाचा उद्देश, रचना व पुढील कार्यपद्धती स्पष्ट करत आगामी काळात मंडळस्तरावर हे अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लातूरचे माजी खासदार तथा कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यशाळेस जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा सरचिटणीस श्री. संजय दोरवे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश कराड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande