आमदार देवेंद्र कोठे यांना पाणीपुरवठा योजनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
सोलापूर, 02 मार्च (हिं.स.)सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पाणीपुरवठा सुधारणा केलो तरच मत मागायला येतो, अशी प्रतिज्ञा केली आहे. गेल्या दहा वर्षात पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही. कोठे यांच्या या प्रतिज्ञामुळे फरक पडला तर सोलापूरकरांचे न
आमदार देवेंद्र कोठे यांना पाणीपुरवठा योजनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही


सोलापूर, 02 मार्च (हिं.स.)सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पाणीपुरवठा सुधारणा केलो तरच मत मागायला येतो, अशी प्रतिज्ञा केली आहे. गेल्या दहा वर्षात पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही. कोठे यांच्या या प्रतिज्ञामुळे फरक पडला तर सोलापूरकरांचे नशीबच. पण छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय तथा सिविल हॉस्पिटलमधील ही परिस्थिती पाहिली तर देवेंद्र कोठे यांना या समस्येत लक्ष घालावेच लागणार आहे. सोलापूरला दररोज पाणीपुरवठा करण्याचे अभिवचन देऊन भाजपने यापूर्वी महापालिकेत सत्तांतर केले. आठ वर्षानंतर ही परिस्थिती पालटली नाही. आता दुहेरी जलवाहिनीचे उदाहरण देत सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पाणीपुरवठा सुधारणा करतो अन्यथा मतच मागायला येत नाही, अशी प्रतिज्ञा केली आहे. यंदाच्या पावसाळ्यात भीमा नदीला तीन महापूर येऊन गेले. पण गतवर्षी उन्हाळ्यात जी स्थिती होती ती आत्तापर्यंत सोलापूर शहर पाणीपुरवठ्याची आहे. सोलापूर शहरातील गावठाण भागाला तीन दिवसाआड तर जुळे सोलापूर व इतर हद्दवाढ भागात सात दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. देवेंद्र कोठे यांच्या प्रतिज्ञानंतरही पाणीपुरवठ्यात सुधारणा झालेली नाही. आशा करूया की जुळे सोलापूर व हद्दवाढ भागाचे दिवस कमी होतील. याउलट यापूर्वी काँग्रेस सत्तेत असताना दुष्काळात दुबार पंपिंग करून जुळे सोलापूर व हद्दवाढ भागाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन याला कारणीभूत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला कितपत यश येईल याबद्दल नागरिकांतून शंका व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande