
नवी दिल्ली, 02 मार्च (हिं.स.) २०२६ च्या फिफा विश्वचषकारवर इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराण बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. इराणी फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष मेहदी ताज यांनी सांगितले आहे की, सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रीय संघाला फुटबॉल खेळण्यासाठी अमेरिकेत जाणे अत्यंत कठीण आहे. विश्वचषक ११ जून ते १९ जुलै दरम्यान अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडामध्ये खेळला जाणार आहे. आणि इराण आपले तिन्ही सामने अमेरिकेत खेळणार आहे. मेहदी ताज म्हणाले, या हल्ल्यानंतर, आपण विश्वचषकाची आशा आणि उत्साहाने वाट पाहू शकत नाही.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले, ज्यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. खेळांव्यतिरिक्त इराणला मोठ्या राजकीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ट्रम्प प्रशासनाने इराणी चाहत्यांना देशात प्रवेश देण्यास नकार दिला आहे. परिणामी, इराणी संघाला अमेरिकेत प्रवास करणे आणि मुक्तपणे खेळणे कठीण वाटत आहे.
इराणला फुटबॉल विश्वचषकासाठी ग्रुप जी मध्ये स्थान देण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार, इराण त्यांचे सामने अमेरिकन शहरांमध्ये खेळेल...
१५ जून: विरुद्ध न्यूझीलंड; ठिकाण: इंगलवुड, कॅलिफोर्निया
२१ जून: विरुद्ध बेल्जियम; ठिकाण: इंगलवुड, कॅलिफोर्निया
२६ जून: विरुद्ध इजिप्त; ठिकाण: सिएटल
आगामी ११ जून ते १९ जुलै दरम्यान विश्वचषक अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) इराण-इस्रायल मुद्द्यावर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. जर इराणने स्पर्धेतून माघार घेतली तर फिफाचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे