महिंद्रा XEV 9e सिनेलक्स एडिशन भारतात लॉन्च
मुंबई, 02 मार्च (हिं.स.)। स्वदेशी एसयूवी निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओचा विस्तार करत महिंद्रा XEV 9e या मॉडेलचे नवीन सिनेलक्स एडिशन बाजारात सादर केले आहे. या स्पेशल एडिशनची एक्स-शोरूम किंमत 29.35 लाख रुपये
mahindra launches xev 9e cineluxe edition


मुंबई, 02 मार्च (हिं.स.)। स्वदेशी एसयूवी निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओचा विस्तार करत महिंद्रा XEV 9e या मॉडेलचे नवीन सिनेलक्स एडिशन बाजारात सादर केले आहे. या स्पेशल एडिशनची एक्स-शोरूम किंमत 29.35 लाख रुपये ठेवण्यात आली असून, 2 मार्च 2026 पासून याची बुकिंग सुरू होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या मॉडेलची डिलिव्हरी 10 मार्च 2026 पासून ग्राहकांना मिळण्यास सुरुवात होईल.

नवीन सिनेलक्स एडिशन हे स्टँडर्ड XEV 9e पेक्षा अधिक प्रीमियम स्वरूपात सादर करण्यात आले असून, विशेषतः इंटीरियर डिटेलिंग आणि इन-केबिन अनुभवावर अधिक भर देण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या बाह्य रचनेत सॅटिन ब्लॅक आणि सॅटिन व्हाईट अशा दोन आकर्षक रंग पर्यायांचा समावेश करण्यात आला आहे. हे रंग चेस्टनट ब्राउन आणि नॉक्टर्न ब्लॅक स्मूद ग्रेन लेदरेट इंटीरियर थीमसोबत सुसंगतपणे जोडण्यात आले आहेत, ज्यामुळे वाहनाला अधिक लक्झरी आणि आधुनिक लुक प्राप्त झाला आहे.

इंटीरियरमध्ये डॅशबोर्ड, सीट्स आणि डोअर पॅनल्सवर विशेष टेक्स्चर आणि प्रीमियम फिनिश देण्यात आली आहे. शांत, लाउंजसारखा अनुभव देण्यावर कंपनीने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या एसयूव्हीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कोस्ट-टू-कोस्ट ट्रिपल एचडी डिस्प्ले सेटअप, जो संपूर्ण डॅशबोर्डच्या रुंदीपर्यंत पसरलेला आहे. यामुळे ड्रायव्हिंगदरम्यान डिजिटल अनुभव अधिक सुलभ आणि आकर्षक बनतो.

मनोरंजनासाठी 16-स्पीकर हार्मन कार्डन ऑडिओ सिस्टीम देण्यात आली असून त्यात डॉल्बी अॅटमॉसचा सपोर्ट उपलब्ध आहे. याशिवाय, इन्फिनिटी रूफ आणि जे

16 मिलियनपेक्षा अधिक रंग पर्याय असलेली अॅम्बिएंट लाईटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या मूडनुसार आणि ड्रायव्हिंग परिस्थितीनुसार केबिनचे वातावरण सानुकूलित करण्याची सुविधा मिळते.

हे स्पेशल एडिशन स्टँडर्ड मॉडेलच्या टॉप-स्पेसिफिकेशन Pack Three व्हेरिएंटवर आधारित आहे. यात स्ट्रेटअहेड व्हिजनX ऑगमेंटेड रिअॅलिटी हेड-अप डिस्प्ले, आयडेंटिटी ड्रायव्हर आणि ऑक्युपंट मॉनिटरिंग सिस्टीम, ऑटो पार्क असिस्टसह हँड्सफ्री पार्किंग आणि सिक्योर360 कॅमेरा यांसारखी प्रगत फीचर्स देण्यात आली आहेत. तसेच कॅम्प, कीप आणि पॉपल HVAC मोड, कस्टम ड्राइव्ह मोड, डिजिटल की अॅक्सेस, सिक्योर360 प्रो आणि पर्सनलाइज्ड यूजर प्रोफाइल यांचाही समावेश करण्यात आला आहे.

पॉवरट्रेनच्या दृष्टीने या स्पेशल एडिशनमध्ये 79 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, पूर्ण चार्जवर ही एसयूव्ही 500 किलोमीटरपेक्षा अधिक रेंज देऊ शकते. या मॉडेलचे पॉवर आउटपुट 210 kW असून, पीक टॉर्क 380 Nm आहे. सध्या या वाहनाचा फक्त रियर-व्हील ड्राइव्ह व्हर्जन बाजारात उपलब्ध असून, ऑल-व्हील ड्राइव्ह पर्याय अद्याप सादर करण्यात आलेला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande