चांडाळचौकडी कितीही प्रयत्न करत असली, तरी शरद पवारांची तिसरी पिढी एकत्र - रोहिणी खडसे
जळगाव, 02 मार्च (हिं.स.) - चांडाळचौकडी कितीही प्रयत्न करत असली तरी शरद पवारांची तिसरी पिढी एकत्र आली आहे अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली. ही रोहिणी खडसे यांची ही पोस्ट चर्चेच
रोहिणी खडसे


जळगाव, 02 मार्च (हिं.स.) - चांडाळचौकडी कितीही प्रयत्न करत असली तरी शरद पवारांची तिसरी पिढी एकत्र आली आहे अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली. ही रोहिणी खडसे यांची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

रोहिणी खडसे पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत की, स्व. अजित दादा पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी #VSR कंपनीच्या मालकाबाबत एक धक्कादायक व्हिडिओ समोर आणला आहे. सरकारने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करायला पाहिजे.

यात एक आशादायक चित्र आहे की चांडाळचौकडी कितीही प्रयत्न करत असली तरी स्व. अजित दादा पवार यांना न्याय मिळावा त्यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांची तिसरी पिढी एकत्र आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande