
सोलापूर, 02 मार्च (हिं.स.)।आझाद मैदानावर पाणी व स्वच्छता कर्मचारी यांनी आदोलन केले नंतर पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन या योजनेमध्ये काम करणारे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचारी यांचे वेतनासाठी ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती राज्य कृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी दिली. पाणी पुरवठा व स्वच्छता शासकीय कर्मचारी राज्य कृती समितीने आझाद मैदानावर आंदोलन केले होते. शासन सेवेत कायम करणे बरोबर थकीत वेतन व इतर विविध मागण्या करणेत आले होते. मुख्य सचिव राजेश आग्रवाल यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.
या बैठकीस ग्रामविकास विभागाचे सचिव, पाणी पुरवठा विभागाचे सचिव , अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग, प्रधान सचिव नियोजन विभाग, अभियान संचालक जलजीवन मिशन, अभियान संचालक स्वच्छ भारत मिशन ग्रामीण उपस्थित होते.
मुख्य सचिव यांचे बैठकीत न्यायप्रविष्ठ असलेले व न्यायालयाने निवाडे दिलेले कंत्राटी कर्मचारी यांचेबाबत शासन सेवेत कायम करणेसाठी समिती गठित करणेचा शासन निर्णय काढन्यात आला आहे. यामुळे राज्य कृती समितीचे प्रयत्नात यश आले आहे, असेही कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत यांनी सांगितले.प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेणेत आली होती. या बैठकीत विभागाचे कर्मचारी यांचे ९ मागण्या बाबत समिती गठीत करणेचा निर्णय घेणेत आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड