
नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.)। द्रौपदी मुर्मू, सी. पी. राधाकृष्णन आणि नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ईद-उल-फित्रच्या निमित्ताने देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देत समाजात बंधुभाव, सद्भावना आणि समृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या संदेशात म्हटले की, ईद-उल-फित्रच्या पावन प्रसंगी सर्व देशवासियांना, विशेषतः मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा. हा सण आत्मसंयम, सेवा, परोपकार आणि वंचित घटकांप्रती करुणा बाळगण्याची प्रेरणा देतो. या निमित्ताने समाज आणि राष्ट्र अधिक सक्षम करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटले, “ईद मुबारक! हा पवित्र सण आशा, सद्भावना आणि करुणा वाढवणारा ठरो आणि प्रत्येकाच्या जीवनात आनंद व यश घेऊन येवो.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर आपल्या संदेशात देशवासियांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा देताना म्हटले की, हा दिवस समाजात बंधुभाव आणि दयाभाव अधिक बळकट करो. त्यांनी सर्वांच्या सुख, शांती आणि उत्तम आरोग्याची कामना केली.
उल्लेखनीय म्हणजे, देशभरात ईद-उल-फित्रचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात येत असून लोक एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा देत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule