भारतीय महिला क्रिकेट संघ डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार
नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.)क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (CSA) भारतीय महिला क्रिकेट संघासोबत होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही मालिका डिसेंबर २०२६ मध्ये खेळवली जाणार आहे. यामध्ये एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समा
भारतीय महिला क्रिकेट संघ


नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.)क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (CSA) भारतीय महिला क्रिकेट संघासोबत होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही मालिका डिसेंबर २०२६ मध्ये खेळवली जाणार आहे. यामध्ये एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. CSA ने सांगितले की, कसोटी सामना २० ते २३ डिसेंबर दरम्यान गेबरहा येथे खेळला जाईल, तर एकदिवसीय मालिका ९ ते १५ डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. हे सामने पोटचेफस्ट्रूम, ब्लोमफॉन्टेन आणि केप टाऊनमध्ये होणार आहेत.

सीएसएने ने म्हटले आहे, प्रोटियाज संघ ९ ते १५ डिसेंबर दरम्यान तीन सामन्यांच्या आयसीसी महिला चॅम्पियनशिप एकदिवसीय मालिकेत भारताचा सामना करणार आहे. पहिला सामना पोटचेफस्ट्रूममध्ये, दुसरा ब्लोमफॉन्टेनमध्ये आणि तिसरा व अंतिम एकदिवसीय सामना केप टाऊनमध्ये खेळला जाईल. या दौऱ्यात गेबरहा येथे एका कसोटी सामन्याचाही समावेश आहे.

सीएसएने पुढे सांगितले की, भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमधील हा चौथा कसोटी सामना असणार आहे. गॅबरहा येथे खेळला जाणारा हा दुसरा कसोटी सामना असेल. यापूर्वी डिसेंबर १९६० मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड येथे खेळले होते.

भारतीय महिला संघ २०२६ मध्ये दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. ते एप्रिलमध्येही दौरा करतील आणि पाच टी-२० सामने खेळतील. याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, हे सामने १७ ते २७ एप्रिल दरम्यान खेळले जातील.

सीएसएने सांगितले की, ऑस्ट्रेलियन संघही तीन टी-२० सामने, तीन एकदिवसीय सामने आणि एक कसोटी सामना खेळण्यासाठी दौरा करणार आहे. हे सामने मार्च-एप्रिल २०२७ मध्ये खेळले जातील. या दौऱ्याची सुरुवात १८ मार्च रोजी टी-२० मालिकेने होईल, त्यानंतर तीन एकदिवसीय सामने आणि एक अंतिम कसोटी सामना होईल. ही मालिका किम्बर्ली, बेनोनी, कुगोम्पो सिटी, गॅबरहा, पार्ल, डर्बन आणि नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स येथे खेळवली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande