भारतीय संघाचा जूनमध्ये आयर्लंड दौरा; दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार
नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.) भारतीय पुरुष संघ यावर्षी जूनमध्ये आयर्लंडचा दौरा करणार आहे. हा संघ आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. भारताने यापूर
भारतीय क्रिकेट संघ


नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.) भारतीय पुरुष संघ यावर्षी जूनमध्ये आयर्लंडचा दौरा करणार आहे. हा संघ आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. भारताने यापूर्वी २०१८, २०२२ आणि २०२३ मध्ये आयर्लंडचा दौरा केला असून, आठ वर्षांत एकूण तीन दौरे झाले आहेत.

मालिकेतील दोन्ही सामने बेलफास्टमध्ये होणार आहेत. बीसीसीआयने म्हटले आहे की, २००७ नंतर भारत प्रथमच बेलफास्टमध्ये खेळणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना २६ जून रोजी आणि दुसरा टी-२० सामना २८ जून २०२६ रोजी खेळला जाईल. हे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरू होतील.

यापूर्वी आयर्लंडचे उच्च कामगिरी संचालक ग्रॅहम वेस्ट यांनी या मालिकेची पुष्टी केली होती, पण आता बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा केली आहे. आयपीएल २०२६ नंतर, भारतीय संघ जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर संघ १ ते १९ जुलै दरम्यान होणाऱ्या पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे.

वेस्ट म्हणाले, २०२८ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्रता निश्चित झाल्यामुळे, पॉल स्टर्लिंगने टी-२० कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवीन कर्णधाराला जूनमध्ये भारताविरुद्धच्या मालिकेपासून आपली स्वतःची शैली आणि रणनीती स्थापित करण्याची संधी मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande