न्यूझीलंड महिला संघाची चौथ्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ६ विकेट्सने मात
वेलिंग्टन (न्यूझीलंड), २२ मार्च (हिं. स): न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाला 6 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह यजमान संघाने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील अ
जेस केर


वेलिंग्टन (न्यूझीलंड), २२ मार्च (हिं. स): न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाला 6 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह यजमान संघाने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील अंतिम सामना २५ मार्च रोजी क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हलवर खेळला जाणार आहे.

वेलिंग्टन येथे रविवारी झालेल्या सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत सहा विकेट्स गमावून १५९ धावा केल्या. अनेरी डर्कसेनने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. तिने ३२ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५५ धावा केल्या. डर्कसेन व्यतिरिक्त, सलामीवीर सुने लुसनेही २९ चेंडूंमध्ये चार चौकारांसह ३० धावा केल्या. नादिन डी क्लर्कने २० धावा, क्लोई ट्रायॉनने १४ धावा, कायला रेनेकेने १३ धावा आणि कर्णधार लॉरा वॉल्व्हार्डने १० धावांचे योगदान दिले.न्यूझीलंडकडून, जेस केरने चार षटकांत १६ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. कर्णधार अमेलिया केर आणि सोफी डिव्हाईन यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

१६० धावांचे लक्ष्य गाठताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. यष्टीरक्षक-फलंदाज इसाबेला गेज ६ धावांवर बाद झाली. त्यानंतर जॉर्जिया प्लायमर आणि कर्णधार अमेलिया केर यांनी डाव सावरला. जॉर्जियाने २२ चेंडूंमध्ये पाच चौकारांच्या मदतीने २९ धावा केल्या, तर कर्णधार केरने २९ चेंडूंमध्ये चार चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. या दोन विकेट्स गमावल्यानंतर, अनुभवी सोफी डिव्हाईनने पुन्हा एकदा शानदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. तिने चार षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने ३४ चेंडूंमध्ये ६४ धावांची स्फोटक खेळी केली. ब्रुक हॅलिडे १६ धावांवर आणि मॅडी ग्रीन ९ धावांवर नाबाद राहिल्या. डेव्हाइनच्या खेळीमुळे न्यूझीलंडने १८.३ षटकांत लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेकडून क्लोई ट्रायनने दोन बळी घेतले, तर डर्कसन आणि एन म्लाबा यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande