महाराष्ट्राचे सेपक टकरा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी रांची, झारखंड येथे रवाना
Maharashtra's Sepak Takra team leaves for Ranchi, Jharkhand for national competition
Maharashtra's Sepak Takra


दोन्हीही संघ चांगली कामगिरी करतील असा प्रशिक्षकांना विश्वास

नाशिक, 22 मार्च (हिं.स.)।

दिनांक २३ ते २७ मार्च २०२६ दरम्यान रांची- झारखंड येथे उपकनिष्ठ गटाच्या २८व्या राष्ट्रीय सेपक टकरा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ आज वर्धा येथून रवाना झाला. या खेळाडूंचे सराव शिबिर दि. १५ मार्चपासून अवधेश क्रीडा मंडळ, वर्धा येथे पार पडले.

या खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षक विनय मून, दर्शन हस्ती, यांचे मार्गदर्शन लाभले. मुलांच्या संघासोबत संघ मार्गदर्शक म्हणून रविकुमार बकवाड आणि संघ व्यवस्थापक म्हणून अण्णा वाकडे, तर मुलींच्या संघासोबत मार्गदर्शक म्हणून दर्शन हस्ती, आणि संघ व्यवस्थापक म्हणून सौ. सारिका बकवाड हे काम बघणार आहेत. या संघाला राज्य संघटनेचे अध्यक्ष विपिन कामदार, सचिव योगिंदर पांडे यांनी शुभेच्छा दिल्या.

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये मुलांमध्ये रुद्र पिडकलवार, समरजीत कदम, शिवराज सोले, कुंदन बंटे, नाविन्य थोटे, प्रणव दातीर, श्रीराज निकम, आदित्य पांगारेकर, तर मुलींच्या संघात वैष्णवी वाघ, सई कोळी, पूर्वी जाधव, भक्ती नागणे, नम्रता कांबळे, रिया मांगीनकेरी, वेदिका महाले, जेसीका काळे, अक्षरा जयवाडे, नैनसी जयस्वाल, माही नागदिवे, अंजली राठोड, सृष्टी जंगीलवाड, श्रेया भोंगे, वंशिका किशोर खेळाडूंचा समावेश आहे. या महाराष्ट्राच्या संघात मुलांमध्ये नाशिकचे श्रीराज निकम, प्रणव दातीर तर मुलींच्या संघात वेदिका महाले यांचा समावेश आहे.

सर्व खेळाडूंचा शिबिरात चांगला सराव झाला असून खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करतील आणि महाराष्ट्राला पदक मिळवून देतील असा विश्वास प्रशिक्षक रविकुमार बकवाड आणि दर्शन हस्ती यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande