१५ वर्षीय फॅनी उटागुशिमानिंदेचे टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पणात शतक
नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.)फॅनी उटागुशिमानिंदे क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनली आहे. अवघ्या १५ वर्षांच्या या तरुण रवांडाच्या या क्रिकेटपटूने असा पराक्रम केला आहे, जो यापूर्वी कोणत्याही महिला क्रिकेटपटूला करता नाही. नायजेरियामध्ये सुरू असलेल्या न
फॅनी उटागुशिमानिंदे


नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.)फॅनी उटागुशिमानिंदे क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनली आहे. अवघ्या १५ वर्षांच्या या तरुण रवांडाच्या या क्रिकेटपटूने असा पराक्रम केला आहे, जो यापूर्वी कोणत्याही महिला क्रिकेटपटूला करता नाही. नायजेरियामध्ये सुरू असलेल्या नायजेरिया इन्विटेशनल महिला टी२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान, फॅनीने घानाविरुद्ध आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पणातच एक शानदार शतक झळकावले. तिने ६५ चेंडूंमध्ये नाबाद १११ धावा केल्या.

फॅनी उटागुशिमानिंदे ही आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पणात शतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. १५ वर्षे आणि २२३ दिवसांची असताना, ती महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारी सर्वात तरुण क्रिकेटपटू देखील ठरली आहे. यापूर्वी, पदार्पणातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या कॅरेन रोल्टनच्या नावावर होताय २००५ मध्ये तिने इंग्लंडविरुद्ध ९६ धावा केल्या होत्या.

यापूर्वी, सर्वात कमी वयात टी२० आंतरराष्ट्रीय शतक करण्याचा विक्रम युगांडाच्या प्रोस्कोव्हिया एलाकोच्या नावावर होता. वयाच्या १६ वर्षे आणि २३३ दिवसांत तिने हा पराक्रम केला होता. फॅनीच्या शानदार खेळीमुळे, रवांडाने आपल्या २० षटकांत २१०/३ अशी मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, घानाला आपल्या २० षटकांत केवळ ८८/८ धावाच करता आल्या आणि त्यांना या सामन्यात १२२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande