लातूरात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 3719 लोकांनी घेतला लाभ
लातूर, 23 मार्च (हिं.स.)। माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगे यांच्या सूचनेनुसार निलंगा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजयराज हलगरकर यांच्या प्रमुख नेतृत्वात निलंगा शहरातील सर्व प्रभागात आयुष्यमान भारत आरोग्य मोहीम शिबिर मोठया प्रमाणात राबविण्य
आयुष्यमान भारत


लातूर, 23 मार्च (हिं.स.)।

माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगे यांच्या सूचनेनुसार निलंगा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजयराज हलगरकर यांच्या प्रमुख नेतृत्वात

निलंगा शहरातील सर्व प्रभागात आयुष्यमान भारत आरोग्य मोहीम शिबिर मोठया प्रमाणात राबविण्यात येत आहे..

निलंगा शहरातील सर्व प्रभागात नगराध्यक्ष नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते व आशा स्वयंसेविकेच्या माध्यमातून निलंगा शहरातील 3719 नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ घेत कार्ड काढून घेतला. तसेच निलंगा शहरात आत्तापर्यंत 5500 हून अधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यावेळी निलंगा नगरीचे नगराध्यक्ष संजय राज हलगरकर यांनी स्वतः पूर्ण शहरात सगळ्या प्रभागात जाऊन सदरील योजनेचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande