जळगाव : आदिवासी उमेदवारांसाठी मोफत  स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण;  २५ मार्च रोजी मुलाखत
जळगाव, 23 मार्च (हिं.स.) अनुसूचित जमातीतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर (जि. जळगाव) यांच्या वतीने स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. ह
जळगाव : आदिवासी उमेदवारांसाठी मोफत  स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण;  २५ मार्च रोजी मुलाखत


जळगाव, 23 मार्च (हिं.स.) अनुसूचित जमातीतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर (जि. जळगाव) यांच्या वतीने स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १ एप्रिल २०२६ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत एकूण साडेतीन महिन्यांसाठी राबविण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये विविध शासकीय व निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची सखोल तयारी करून घेतली जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान पात्र प्रशिक्षणार्थींना उपस्थितीनुसार दरमहा रु. १०००/- विद्यावेतन देण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी उमेदवारांनीwww.rojgar.mahaswayam.gov.inया संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असून निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखती दि. २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आल्या आहे.

प्रवेशासाठी उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील, महाराष्ट्राचा रहिवासी, किमान दहावी उत्तीर्ण व त्याचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक गुणपत्रिका, आधार कार्ड, बँक पासबुक, दोन पासपोर्ट फोटो व जातीचा दाखला यांसह मूळ व छायांकित प्रती सादर कराव्यात. प्रशिक्षण कालावधीत राहण्याची व भोजनाची व्यवस्था उमेदवारांनी स्वतः करावयाची आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. २, शनि मंदिरामागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५८४-२५१९०६ वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande