नंदुरबार : जनगणनेचे काम अचूक करावे -जिल्हाधिकारी
नंदुरबार,, 23 मार्च (हिं.स.) भारतीय जनगणना 2027 साठी सर्व चार्ज अधिकारी, जनगणना अधिकारी प्रगणक, पर्यवेक्षक तसेच इतर सर्व जनगणना कर्मचारी यांनी जिल्ह्यातील जनगणनेचे काम अत्यंत चांगले व अचूक करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज दि
डॉ. मित्ताली सेठी


नंदुरबार,, 23 मार्च (हिं.स.) भारतीय जनगणना 2027 साठी सर्व चार्ज अधिकारी, जनगणना अधिकारी प्रगणक, पर्यवेक्षक तसेच इतर सर्व

जनगणना कर्मचारी यांनी जिल्ह्यातील जनगणनेचे काम अत्यंत चांगले व अचूक करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज दिल्या. भारतीय जनगणना 2027 च्या पहिला टप्प्याच्या कामकाजासाठी जिल्ह्यातील चार्ज अधिकारी, जनगणना

अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी जिल्हा नियोजन भवन येथे 23 ते 25 मार्च 2026 या कालावधीत प्रशिक्षण

आयोजित करण्यात आले आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी बोलत होत्या. या वेळी सहाय्यक

जिल्हाधिकारी शहादा कृष्णकांत कनवारीया, परिविक्षाधिन सनदी अधिकारी शिवांग सिंग, जनगणना

उपसंचालक सागर बागुल, एसआय जीआरचे श्रीकांत बनकर, सरदार सरोवर प्रकल्प तळोदा उपजिल्हाधिकारी

श्याम वाडकर, जिल्हा समन्वयक प्रदीप सिंग आदि मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी बोलतांना पुढे म्हणाल्या, भारतामध्ये जनगणना 1872 पासून केली जात

असून ही देशातील 16 वी जनगणना आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना आहे. ही जनगणना पुर्ण डिजीटल

आहे. ही जनगणना दोन टप्पात होणार आहे जनजगणेची माहिती संकलीत कशी करावी यासाठी हे तीन

दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थीनी हे प्रशिक्षण चांगल्या प्रकारे समजून घ्यावे

असे त्यांनी यावेळी सांगितले. जनगणना उपसंचालक सागर बागुल व एसआय जीआरचे श्रीकांत बनकर हे या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीना

पी.पी.टी. द्वारे मार्गदर्शन करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande