छ.संभाजीनगर महापालिकेचा अर्थसंकल्प मार्च अखेरपर्यंत
छत्रपती संभाजीनगर, 23 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाकडून अर्थसंकल्प मार्चअखेरपर्यंत सादर केला जाणार आहे. दोन आठवड्यांपासून लेखा विभागामार्फत अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून, हे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येते. २
छत्रपती संभाजीनगर मनपा


छत्रपती संभाजीनगर, 23 मार्च (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाकडून अर्थसंकल्प मार्चअखेरपर्यंत सादर केला जाणार आहे. दोन आठवड्यांपासून लेखा विभागामार्फत अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून, हे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येते. २०२६-२७ चा अर्थसंकल्प साडेतीन हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

महापालिकेवर गेल्या साडेपाच वर्षांपासून प्रशासक होते. गत वर्षी प्रशासक, आयुक्त जी. श्रीकांत यांनी तीन हजार ८३ कोटी चाळीस लाख ९९ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. दरम्यान ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प सादर करणे बंधनकारक असल्याने दोन आठवड्यांपासून लेखा विभागामार्फत अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाकडून संभाव्य कामांची यादी मागवण्यात आली; तसेच नागरिकांना नावीन्यपूर्ण कामे सुचवण्याचे आवाहन करण्यात आले होते. लवकरच अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला जाणार असून, स्थायी समिती त्यात आवश्यक सुधारणा करून सर्वसाधारण समितीला सादर करील. त्यामुळे प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात वाढ होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande