
डोंबिवली, 23 मार्च (हिं.स.)।
लोढाहेवन निळजे येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क. ७११ पंचशिल सामाजिक संस्था (रजि.)पंचशिल महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नाईट अंडर-आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा अर्थात संविधान चषक -२०२६ या स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
स्पर्धेच्याउद्घाटनासाठी.राजेश मोरे (आमदार,कल्याण ग्रामीण), अतुल झेंडे (पोलीस उपायुक्त,परिमंडळ ३,कल्याण), ऍड हर्षाली विजय चौधरी- थविल (महापौर,कल्याण डोंबिवली मनपा.), राहुल दामले (उपमहापौर,कल्याण डोंबिवली मनपा.) राजू पाटील (माजी आमदार), विनोद रतन पाटील (अध्यक्ष -क्रिकेट असोसिएशन,कल्याण ग्रामीण), गजानन मोतीराम पाटील (नगरसेवक,प्रभाग क्रमांक ३१), शैलेजा लालचंद भोईर (नगरसेविका प्रभाग क्रमांक ३१) यांना आमंत्रित करण्यात आले होते.
निळजे लोढाहेवन या परिसरात पहिल्यादाच संविधान चषक २०२६ ही स्पर्धा भरविण्यात आली होती प्रसंगी या स्पर्धेला पहिल्याच वर्षी उत्तम प्रतिसाद मिळाला.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi