डोंबिवलीत गॅस सिलेंडर मिळण्यासाठी एजन्सी बाहेर गर्दी
डोंबिवली, 23 मार्च (हिं.स.)।एकीकडे कल्याण शहरात काही ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. तर दुसरीकडे डोंबिवलीतील एकागॅस एजन्सीबाहेर नागरिकांनो गर्दी. केली होती. गर्दी पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Ph001


डोंबिवली, 23 मार्च (हिं.स.)।एकीकडे कल्याण शहरात काही ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. तर दुसरीकडे डोंबिवलीतील एकागॅस एजन्सीबाहेर नागरिकांनो गर्दी. केली होती. गर्दी पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसेना शाखा प्रमुख संदीप नाईक,नितीन यादव,किशोर सोहनी,नारायण गायकवाड यांनी गॅस एजन्सी मध्ये भेट घेऊन नक्की काय विषय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला.ज्या नागरिकांनी गॅस बुक केलाय त्यांना आठ ते दहा दिवस होऊन गॅस न मिळाल्यामुळे एजन्सी मध्ये सर्व नागरिक विचारणा करण्यासाठी जमल्याचे कळले.

एजन्सी च्या अधिकारी वर्गाशी चर्चा करून नागरिकांना लवकरात लवकर गॅस मिळून द्यावा ही विनंती शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आली.

_____________

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande