‘ईपीएफओ’कडून ‘ऑटो-सेटलमेंट’ सुविधा मिळणार
निष्क्रिय खात्यांतील रक्कम थेट बँकेत जमा करणार नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) : कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) निष्क्रिय खात्यांमध्ये पडून असलेल्या लावारिस रकमेबाबत मोठे पाऊल उचलत आहे. ईपीएफओ लवकरच ऑटो-सेटलमेंट सुविधा सुरू करण्याच्या तयारीत अ
ईपीएफओ-लोगो


निष्क्रिय खात्यांतील रक्कम थेट बँकेत जमा करणार

नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) : कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) निष्क्रिय खात्यांमध्ये पडून असलेल्या लावारिस रकमेबाबत मोठे पाऊल उचलत आहे. ईपीएफओ लवकरच ऑटो-सेटलमेंट सुविधा सुरू करण्याच्या तयारीत असून, यामुळे निष्क्रिय खात्यांतील पैसे थेट खातेदारांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.

या नव्या सुविधेमुळे खातेदारांना कोणताही कागदी दावा (क्लेम) करावा लागणार नाही. आधारशी सत्यापित खात्यांमधील रक्कम आपोआप त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. सध्या सुमारे 81 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये तब्बल 5,200 कोटी रुपये अडकलेले आहेत.यामध्ये सुमारे 14,000 खात्यांमध्ये 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे, तर 38,000 खात्यांमध्ये 1 ते 5 लाख रुपयांदरम्यानची रक्कम आहे. तसेच 41,000 खात्यांमध्ये 50 हजार ते 1 लाख रुपयांदरम्यानची रक्कम शिल्लक आहे.

केंद्रीय न्यासी मंडळाने (सीबीटी) सुरुवातीच्या टप्प्यात 1,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम असलेल्या खात्यांच्या स्वयंचलित निपटाऱ्याला मंजुरी दिली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2026 पर्यंत ईपीएफओकडे 31.8 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये सुमारे 10,181 कोटी रुपये लावारिस अवस्थेत पडून आहेत.

ही सुविधा विशेषतः निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांनी दीर्घकाळ आपले खाते क्लेम केलेले नाही. ईपीएफओकडून अशा खात्यांना निष्क्रिय घोषित केले जाते, ज्यावर व्याज मिळणे बंद होते. साधारणतः 55 वर्षांनंतर निवृत्त झालेल्या आणि तीन वर्षे कोणतेही योगदान न केलेल्या खात्यांना निष्क्रिय मानले जाते. मात्र, 55 वर्षांखालील सदस्यांना 58 वर्षांपर्यंत व्याज मिळत राहते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande