
- पारदर्शकतेशी कटिबद्धता हीच सर्वत्र ओळख
पनवेल, 23 मार्च (हिं.स.) - तब्बल १३९ वर्षे जुन्या मुथूट पप्पाचन ग्रुपची (जी मुथूट ब्लू) मौल्यवान धातूची शाखा मुथूट एक्झिम (प्रायव्हेट) लिमिटेडने आपल्या पनवेल येथील १०० व्या गोल्ड पॉइंट सेंटरचे उद्घाटन केले आहे. तसेच या उद्घाटनासह त्यांनी भारतातील संघटित सुवर्ण पुनर्वापर क्षेत्रामधील आपले नेतृत्व अधिक बळकट केले आहे.
मुथूट पप्पाचन ग्रुपचा किरकोळ विक्री विभाग असलेल्या 'मुथूट गोल्ड पॉइंट'ने, सुवर्ण पुनर्वापर क्षेत्रात एक सुव्यवस्थित कार्यप्रणाली सादर करणारी पहिली संघटित आणि राष्ट्रीय स्तरावरील संस्था म्हणून, या क्षेत्रात एक अग्रगण्य भूमिका बजावली आहे. आपल्या 'गोल्ड पॉइंट सेंटर्स'च्या माध्यमातून, ही कंपनी ग्राहकांना जुने आणि न वापरले गेलेले सोने विकण्यासाठी एक पारदर्शक, वैज्ञानिक आणि विश्वासार्ह मार्ग उपलब्ध करून देते; ज्यामुळे 'चक्रीय सुवर्ण अर्थव्यवस्थे'ला हातभार लागत आहे. ग्राहकांचा वाढता विश्वास आणि संघटित सेवांसाठी असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन, मुथूट एक्झिमने पुढील दोन वर्षांत आपल्या व्यवसायाचा विस्तार आणखी करण्याची योजना आखली आहे.
या केंद्रांच्या माध्यमातून, कंपनी ग्राहकांकडून थेट जुने आणि वापरात नसलेले सोने खरेदी करते; त्यानंतर या सोन्याचे शुद्धीकरण करून, शुद्ध २४ कॅरेट सोन्याच्या वड्यांच्या स्वरूपात ते पुन्हा देशांतर्गत बाजारपेठेत आणले जातात. ही प्रक्रिया सोन्याच्या नवीन खाणी खोदण्याची (खननाची) आवश्यकता कमी करण्यास मदत करते, तसेच देशांतर्गत सोन्याच्या पुरवठा साखळीला बळ देते आणि सोन्याच्या योग्य वापराला प्रोत्साहन देते. स्थापनेपासून आतापर्यंत, 'मुथूट गोल्ड पॉइंट'ने ५५,००० हून अधिक ग्राहकांकडून जवळपास ५ टन (१ टन = १,००० किलोग्रॅम) जुने सोने खरेदी केले आहे. यापैकी सुमारे ४० टक्के ग्राहक पुन्हा व्यवहार करण्यासाठी परत आले आहेत; ही गोष्ट हे दर्शवते की या ब्रँडच्या/ गोल्ड पॉइंट सेंटर्सच्या सोन्याच्या मूल्यमापनाच्या पारदर्शक प्रक्रियेवर ग्राहकांचा असलेला गाढ विश्वास.
जागतिक सोन्याच्या परिषदेच्या मते, भारतीय कुटुंबांकडे एकत्रितपणे पाहायला गेलं तर अंदाजे ३० हजार टन सोने आहे आणि त्यातील अगदी लहान भागाचे म्हणजे सुमारे एक टक्का सोन्याचा पुनर्वापर केल्यास आयातीवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो आणि परिणामी चालू खात्यातील तुटीची परिस्थिती सुधारण्यास आणि आपल्या देशासाठी स्थूल आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यास मदत होऊ शकते. तसेच सोन्याचा पुनर्वापर हा पारंपरिक खाणकामापेक्षा अधिक पर्यावरणपूरक पर्याय म्हणून समोर आला आहे; कारण पारंपरिक खाणकामामुळे संसाधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून, अनेकदा त्यामुळे जंगलतोड, जलप्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनासारख्या समस्या निर्माण होतात. नवीन खाणकामाची गरज कमी केल्यामुळे, सोन्याचे पुनर्वापर हे नैसर्गिक संसाधने आणि ऊर्जेचे संवर्धन करण्यास मदत करते, जे आजच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुथूट गोल्ड पॉइंट सेंटर्स आपल्या पारदर्शकतेच्या कटिबद्धतेसाठी सर्वत्र ओळखले जातात; ज्यामुळे ग्राहकांना सोन्याच्या मूल्यांकनाची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहता येते आणि त्यांना त्यांच्या सोन्याचा योग्य व अचूक मोबदला मिळतो. १० हजार रुपयांपर्यंतच्या सोन्यासाठी त्वरित रोख भरणा केला जातो, मात्र त्यापेक्षा जास्त रकमेसाठी आयएमपीएस, एनईएफटी किंवा आरटीजीएसद्वारे प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे एक सुरळीत आणि विश्वासार्ह व्यवहाराचा अनुभव ग्राहकांना मिळतो.
देशभरातील ग्राहकांसाठी योग्य सुवर्ण पुनर्वापर अधिक सुलभ - थॉमस मुथूट
आपल्या कार्यक्षेत्राच्या विस्ताराबाबत भाष्य करताना, मुथूट पप्पाचन ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मुथूट एक्झिमचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस मुथूट या उद्घाटनाबद्दल बोलताना म्हणाले की, “आमच्या १०० व्या ‘मुथूट गोल्ड पॉइंट’ सेंटरचा शुभारंभ हा भारतात सुव्यवस्थित आणि संघटित सुवर्ण पुनर्वापर कार्यक्षेत्र उभारण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या काही वर्षांत, आम्ही असे पारदर्शक आणि विश्वासार्ह व्यासपीठ निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्याद्वारे ग्राहकांना त्यांच्याकडे वापरात नसलेले सोन्याच्या दागिन्यांचे योग्य मूल्य मिळवता येते आणि अधिक शाश्वत सुवर्ण पुरवठा साखळीत योगदान देता येते. पर्यावरणीय आणि आर्थिक फायद्यांमुळे जागतिक स्तरावर सुवर्ण पुनर्वापराचे महत्त्व वाढत असताना, आम्ही आमच्या ‘गोल्ड पॉइंट सेंटर्स’चे जाळे विस्तारणे आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना सादर करणे सुरूच ठेवू; ज्यामुळे देशभरातील ग्राहकांसाठी योग्य सुवर्ण पुनर्वापर अधिक सुलभ होईल.”
आगामी वर्षांमध्ये आमचा विस्तार आणखी वाढवण्याचे ध्येय - केयूर शाह
मुथूट एक्झिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी केयूर शाह म्हणाले की, “१०० गोल्ड पॉइंट सेंटर्सचा टप्पा गाठणे हे मुथूट गोल्ड पॉइंटची लक्षणीय वाढ आणि भारतात संघटित सुवर्ण पुनर्वापराबाबत वाढत असलेली जागरूकता स्पष्ट करते. आमची विस्तार रणनीती ही मूल्यमापन प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वास कायम राखत, ग्राहकांसाठी अधिक व्यापक सुविधा निर्माण करण्यावर भर घालत आहे. प्रगत एक्सआरएफ आणि अल्ट्रासोनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या 'मोबाइल व्हॅन्स'सारख्या किरकोळ सेवा केंद्रांच्या माध्यमातून, आम्ही सुवर्ण पुनर्वापराची प्रक्रिया ग्राहकांच्या अधिक जवळ नेण्याचे नवनवीन मार्ग देखील शोधत आहोत. सुवर्ण मुद्रीकरणाच्या विश्वसनीय आणि सोयीस्कर पर्यायांची मागणी सातत्याने वाढत असल्याने, आगामी वर्षांमध्ये आमचा विस्तार आणखी वाढवण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये, आम्ही संपूर्ण भारतात जवळपास ६० 'गोल्ड पॉइंट सेंटर्स' सुरू करत, लक्षणीय आणि अविश्वसनीय वाढ नोंदवली आहे.”
मुथूट एक्झिम प्रा. लिमिटेड (एमईपीएल)
मुथूट एक्झिम प्रा. लि. ही मुथूट पप्पाचन समूहाची मौल्यवान धातू बनविणारी शाखा आहे. मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत नाविन्यपूर्ण उत्पादने आणण्यासाठी आणि उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी प्रसिद्ध अशी MEPL ही भारतात सुवर्ण पुनर्वापर केंद्र सुरू करणारी पहिली संघटित कंपनी होती. 2015 मध्ये कोईम्बतूरमध्ये एमईपीएलची स्थापना झाल्यापासून उच्च-गुणवत्तेची आणि परवडणारी उत्पादने प्रदान करत देशभरातील प्रमुख शहरांमध्ये विस्तार केला आहे.
मुथूट पप्पाचन ग्रुपबद्दल
1887 मध्ये स्थापन झालेला, मुथूट पप्पाचन ग्रुप (एमपीजी) ही भारतीय व्यवसायातील अनन्यसाधारण वैशिष्ट्य असलेली देशव्यापी अस्तित्व असलेली आणि ग्राहकांसाठी उच्च प्रतीची तयार केलेली उत्पादने व सेवा असलेली एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. ज्या समूहाने किरकोळ व्यापारात आपली मुळे रोवली, नंतर वित्तीय सेवा, आदरातिथ्य, ऑटोमोटिव्ह, रियल्टी, आयटी सेवा, आरोग्यसेवा, मौल्यवान धातू आणि पर्यायी ऊर्जा यासह विविध क्षेत्रांमध्ये विविधता आणली. मुथूट फिनकॉर्प लिमिटेड ही तिची प्रमुख कंपनी असून मुथूट पप्पाचन ग्रुप (एमपीजी) आज भारतात प्रभावशाली स्थितीत उभा आहे. ज्यामध्ये 40,000 हून अधिक कर्मचारी, देशभरात 5,200 पेक्षा जास्त शाखांचे विशाल नेटवर्क आणि बॉलीवूड स्टार शाहरुख खान, विद्या बालन सारखे कलाकार त्याचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून आहेत. मुथूट पप्पाचन फाऊंडेशन समूहाची सीएसआर शाखा आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि उपजीविका (एचईईएल) वर लक्ष केंद्रित करणाऱ्या संपूर्ण समूह कंपन्यांसाठी सीएसआर उपक्रम राबविण्याची सुविधा प्रदान करते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी