
नाशिक, 23 मार्च (हिं.स.)।
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठआयोजित स्टार्टअप ऑलिम्पियाड 2026 स्पर्धेत नाशिक येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माण शास्त्र स्वायत्तमहाविद्यालयातील फार्म.डी. (चतुर्थ वर्ष) विद्यार्थीनी प्राजक्ता बालकदास बैरागी हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.स्टार्टअप ऑलिम्पियाड 2026 ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठद्वारे आयोजित करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम उद्योजकता आणि संशोधनवृत्ती विकसित वृद्धिंगत होण्यासाठी केली होती . पर्यावरण आणि अन्नसुरक्षाया गटात तिने सादर केलेल्या डिजिटल बी “Digital Bee” या अभिनव प्रकल्पासाठी तिने प्रथम क्रमांक पटकावला असून तिला ₹२५,०००/- रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.डिजिटल बी “Digital Bee” हा प्रकल्प पर्यावरण संरक्षण आणि अन्नसुरक्षा या दोन्ही महत्त्वाच्या विषयांशी संबंधित असून, मधमाश्यांचे संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर आधारित आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात शेती उत्पादनवाढ, परागीकरण सुधारणा आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी मोठी मदत होईल. या प्रकल्पासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष तांबे व प्रा. माधुरा चोथावे यांनी मार्गदर्शन केले.प्राजक्ताच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. महाविद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला तसेच भविष्यातील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनमध्ये संशोधनात्मक वृत्ती व व्यावसायिक कौशल्य आणि नेतृत्व क्षमतेचे गुण अंगिकारण्यासाठी अश्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांना प्रोसाहित करत असते.असे प्राचार्य डॉ. संतोष तांबे यांनी नमूद केले.तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, कोषाध्यक्ष डॉ. स्मिता हिरे, उपाध्यक्ष डॉ. हरीश आडके, सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, समन्वयक तथा सिनेट सदस्य डॉ. अपूर्व हिरे, तसेच विश्वस्त डॉ. संपदा हिरे आणि डॉ. अद्वय हिरे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV