माजलगावला श्रीराम नवमीनिमित्त विविध कार्यक्रम
बीड, 23 मार्च (हिं.स.)। श्रीराम नवमीनिमित्त शहरातील श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने यंदा धार्मिक, सामाजिक व जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित कार्यक्रमांमध्ये हिंदू एकता व्याख्यानमाला, रक्तदान शिबिर व दुचाकी रॅलीचा सम
माजलगावला श्रीराम नवमीनिमित्त विविध कार्यक्रम


बीड, 23 मार्च (हिं.स.)।

श्रीराम नवमीनिमित्त शहरातील श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने यंदा धार्मिक, सामाजिक व जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित कार्यक्रमांमध्ये हिंदू एकता व्याख्यानमाला, रक्तदान शिबिर व दुचाकी रॅलीचा समावेश आहे. उत्सवाची सुरुवात दि. २३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित 'हिंदू एकता व्याख्यानमाला' या कार्यक्रमाने होणार आहे. या व्याख्यानमालेत धर्म, संस्कृती, इतिहास, समाजएकता व युवकांची भूमिका या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहे. २६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता श्री हनुमान मंदिर, हनुमान चौक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी सकाळी ११ वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक ते झेंडा चौक दरम्यान भव्य दुचाक रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून सायंकाळी ४ वाजता श्रीरामांची शोभायात्रा निघणार आहे. श्रीराम नवमी उत्सव समिती, माजलगाव आयोजित या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी, युवकांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री राम नवमी उत्सव समिती, माजलगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande