
नाशिक, 23 मार्च (हिं.स.)।
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्यूकेशन सोसायटी, या संस्थेच्या भोंसला मिलिटरी कॉलेज येथे शहीद दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली होती. हा दिवस या तरुण क्रांतिकारकांच्या असीम शौर्याची आणि त्यागाची आठवण करून देतो. त्यांच्या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र लढ्याला मोठी प्रेरणा मिळाली होती.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हा जाज्वल्य इतिहास आठवणीत रहावा यासाठी शहीद दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे उप–प्राचार्य डॉ. राजेंद्र नवले पाटील सर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले. महाविद्यालयातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते .
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV