हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करण्याचा निर्णय
कोल्हापूर, 23 मार्च (हिं.स.)। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस गुरुवारी दि. २६ वाढदिवस होत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे हा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करूया, असा संकल्प राष्ट्रवाद
राष्ट्रवादी काँग्रेस  प्रमुखांची बैठक


कोल्हापूर, 23 मार्च (हिं.स.)। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस गुरुवारी दि. २६ वाढदिवस होत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे हा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करूया, असा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यातील प्रमुखांच्या बैठकीत करण्यात आला.

बैठकीच्या सुरुवातीला गडहिंग्लजचे ज्येष्ठ नेते कै. बाळासाहेब कुपेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाभर तालुकानिहाय ठरवण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रमांचे नियोजन असे......

राधानगरी- ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप व गुणवंतांचा सत्कार. करवीर- मातोश्री वृद्धाश्रमात फळेवाटप व सांगवडे येथे ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप. भुयेवाडी येथे शालेय साहित्य व फळे वाटप. भुदरगड- गारगोटी येथे शालेय साहित्य वाटप, ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप व वृद्धाश्रमातील वृद्धांना स्नेहभोजन. पन्हाळा- बाल संकुलामध्ये धान्य वाटप, कोडोली आरोग्य केंद्रामध्ये फळेवाटप व पोर्ले येथे फळेवाटप. गगनबावडा- कातळी येथे गरजूंना धान्यवाटप, धुंदवडे येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. हातकणंगले- वडगाव उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप व आरोग्य शिबिर. भेंडवडे येथे शालेय साहित्याचे वाटप. इचलकरंजीतील आय. जी. एम. रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप व आई वृद्धाश्रमातील वृद्धांना स्नेहजेवण. दक्षिण कोल्हापूर- गडमुडशिंगी येथील हॅंडीकॅप शाळेच्या मुलांना फळेवाटप. गिरगाव येथील राजर्षि शाहू महाराज वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना फळेवाटप. शिरोळ- ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप, गरजूंना धान्यवाटप व शालेय साहित्य वाटप. शाहूवाडी- बांबवडे येथे वृक्षारोपण. मलकापूर येथील अनाथ आश्रमात फळेवाटप.

माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील- बापू, केडीसीसी बँकेचे संचालक रणजीतसिंह पाटील, संचालक रणवीरसिंह गायकवाड, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, गोकुळ दूध संघाचे संचालक किसनराव चौगुलेआदी प्रमुख उपस्थित होते.

*संकल्प पी. एम. सूर्यघर योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना राबवण्याचे.......!*

या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्राचे वाचन जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे यांनी केले. या पत्रात मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे, हा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करा. कुठेही डिजिटल बोर्ड, बॅनर उभा करू नका. या वाढदिवसानिमित्त घरोघरी पी. एम. सूर्यघर योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पाणंद/ रस्ते योजना राबविण्याचे संकल्प हाती घेणार आहोत.

स्वागत व प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी केले. आभार शिवाजीराव देसाई यांनी मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande