
पुणे, 23 मार्च (हिं.स.)। परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आता कायमस्वरूपी स्थलांतरित होणार आहे. आगामी ३० मार्च २०२६ पासून या केंद्राचे कामकाज बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील नवीन वास्तूतून सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे पुणे आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पिंगळे वस्ती) येथे कार्यरत असलेले हे केंद्र आता पूर्णपणे बंद होईल. त्याऐवजी ‘मॉटक्लेयर बिल्डिंग’, पहिला मजला, बाणेर-पाषाण लिंक रस्ता, पाषाण या नवीन ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध राहतील. वाढती गर्दी आणि अत्याधुनिक सुविधांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. बाणेर, पाषाण, औंध, बावधन आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नागरिकांसाठी हे नवीन केंद्र अधिक सोयीचे ठरणार आहे. नव्या कार्यालयात आधुनिक सुविधाही असणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु