दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी
श्रीनगर, 23 मार्च (हिं.स.) : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई करत एकूण 12 ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत हंदवाडा, कुपवाडा, कुलगाम, रफियाबाद आणि सोपोर या भा
एनआयए लोगो


श्रीनगर, 23 मार्च (हिं.स.) : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई करत एकूण 12 ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत हंदवाडा, कुपवाडा, कुलगाम, रफियाबाद आणि सोपोर या भागांचा समावेश होता.

हंदवाडा जिल्ह्यातील गुलोरा परिसरात एका मोठ्या व्यावसायिकाच्या घरावर एनआयएच्या पथकाने छापा टाकला. अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी सखोल झडती घेत कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर संशयास्पद साहित्याची तपासणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, पथकाने पहाटेच कारवाई सुरू केली होती. यापूर्वीही दिल्लीतील स्फोट प्रकरणाच्या अनुषंगाने एनआयएने काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली होती. काजीगुंड, शोपियां आणि पुलवामा या भागांमध्ये संशयितांच्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली होती. या कारवाईत डॉ. अदील, जासिर बिलाल, मौलवी इरफान, डॉ. मुझम्मिल आणि आमिर रशीद यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता.

दरम्यान, दिल्लीतील लाल किला मेट्रो स्थानकाजवळ 10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात एका जिहादी दहशतवाद्याने कारमधून स्वतःला उडवून दिले होते. या घटनेनंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande